Tag Archive: प्रेम


…. वाट बघता बघता ….



तुझी वाट बघता बघता …

रस्ता तेवढा संपला,

तू तर आलीच नाहीस …

पण अपघात मात्र घडला…


यायचंच नवथ तुला …

हे मी समजून घ्यायला हवं होतं,

वेळ नसल्याचा तूझं कारण …

मला genuine वाटलं होतं…

तू सोबत असतीस ,

तर मला माझ्याही आधाराची गरज नवथी ,

तू फक्त सोबत असावी ,

एवढीच माझी इच्छा होती …


मी तुझी वेड्यासारखी वाट पाहत होतो…

हे मला आत्ता पटलं ,

तुला मात्र अजूनही …

माझं मन नाही कळलं …


वाट पाहून तुझी …

मला वाटतं आत्ता काही उपयोग नाही ….

पण या मनाला कोण समजावत बसणार …

ते माझं ऐकतच नाही ….




…. वाट पाहतोय …

वाट पाहतोय …

त्या शब्दांची,

शब्दांतल्या त्या गोडव्याची,

न गायलेल्या काव्याची ….


वाट पाहतोय …

तुझ्या सोबतीची ,

त्या मधुर हास्याची,

त्या बोलक्या नयनांची …

वाट पाहतोय …

तू येण्याची,

येऊन माझी होण्याची,

मिठीत माझ्या तू ….

सर्व काही विसरून जाण्याची ….


वाट पाहतोय …

अवेळी येणार्या पावसाची,

जोराच्या त्या पावसाने …

तुला भिजून टाकण्याची,

तूझं ओलं सुंदर रूप बघत राहण्याची …


वाट पाहतोय …

त्या स्पर्शाची ,

स्पर्शाताल्या त्या जाणीवेची,

माझ्या स्पर्शाने …

तुझ्या अंगावर येणार्या शहार्याची …

वाट पाहतोय …

त्या क्षणाची,

त्या क्षणी असलेल्या एकांताची,

तू आणि मी आपण दोघेच ,

असू  जेव्हा …. त्या वेळेची….


वाट पाहतोय …

त्या दिवसाची,

तू आणि मी …

एकत्र होण्याची …

पाहिलेल्या स्वप्नांना …

खरोखरचे जगण्याची ….



…… मी प्रेमात पडलो ……..



त्या दिवशी मी,

प्रेमात पडलो,

बरंच लागलं,

पण रक्त … जखम वगैरे काही नाही दिसलं….


तिने हसून माझ्याकडे पाहिलं,

आणि मी तिच्या डोळ्यातच हरउन  गेलो …

तिच्या काळ्या काळ्या केसांत ….

मी स्वतः ला गुंतून बसलो ….

तेव्हा पासून मला Newton’s Law ,

चुकीचा वाटायला लागला..

force of Gravity चा law लिहिताना,

तो थोडासा चुकला ….

Apple झाडावरून सरळ….

जमिनीवरच पडलं,

पण प्रेमात पडल्यापासून….

मला हवेत असल्या सारखं वाटायला लागलं….


रात्रीच्या स्वप्नात…

तिला पाहिलंच …

पण दिवस भर उघड्या डोळ्यात,

तिचंच स्वप्नं दिसत राहिलं …


आज-काल मला पावसात भिजावंसं वाटतं …

जुहू चौपाटी च्या वाळूवार चालावंसं वाटतं,

Bandstand वर तिच्या सोबत बसावंसं वाटतं …

Hiranandani Gardens मधेय फिरावंसं वाटतं …

त्या दिवसापासून मला ….

“कुछ कुछ होता है” वगैरे वाटयाला लागलंय ….

त्यात अजून काय तर ….

मला “दिल तो पागल है” सारखं गाणं पण

आवडायला लागलंय ….


तेव्हापासून माझं मन “Rocky ” मधल्या संजय दत्त सारखं …

तिच्या शिवाय कुठेपण लागत नाही आणि वेळ पण जात नाही …

मी “मोहब्बते” मधल्या जिम्मी शेरगिल सारखा …

चालता चालता थांबतो … तर बसल्या बसल्या कुठेतरी हरउन जातो …


tweeter वर पण आज-काल मी फक्त …

“Love Quotes”च tweet करतो….

माझा Facebook वरचा status पण …

असाच काहीतरी असतो ….

दिवसा गुलाबी ढगांत ….

लाल लाल सूर्य मला भासतो ….

तर रात्री … रंग बिरंगी .. तारे आणि चंद्रा सोबत ….

तिचाच चेहरा मला दिसतो …


प्रेमात पडल्यापासून मी ….

जरा विचित्रच वागायला लागलोय ….

गप्पं गप्पं बसायला लागलोय ….

पण मनातल्या मनात …

वादळांना सामोरे जायला लागलोय ….




…. मी प्रेमातून पडलो ….


प्रेमात पडलो,

हवेत उडलो,

सोबत फिरलो,

movies ला गेलो,

देवळात आलो,

प्रेमगीते गायलो,

स्वप्नात रमलो,

ढगांत शिरलो,

तिच्यासाठी जगलो,

कितींदातरी  मेलो,

मागे मागे धावलो,

वेळेवर पोहचलो,

Platform वर थांबलो,

चौपाटी वर बसलो,

पावसात भिजलो,

तिच्या डोळ्यांत दिसलो,

तिच्या हसण्यात हरवलो,

केसांत गुंतलो,

स्पर्शात संपलो,

खरा समजलो,

खोटं बोललो,

थोडासा हसलो,

मनातच नाचलो,

तरी भरपूर रडलो,

ईशार्या ईशार्यांत खेळलो,

Arguments मध्ये हरलो,

बोलून बोलून दमलो,

Problems मध्ये फसलो,

लोच्यांत अडकलो,

लफडी जिंकलो,

पण राड्यांत पडायला थोडा घाबरलो,

रात्रभर जागलो,

Lecturer’s ला झोपलो,

सोबत राहिलो,

कधीच एकटा नाही चाललो,

तिच्या शिवाय बाकी सगळं विसरलो,

मित्रांना नडलो,

घरातल्यांबरोबर भांडलो,

पण शेवटी ……

जेव्हा प्रेमातून पडलो ……

तेव्हा कुठे खरं प्रेम करायला शिकलो ….!!!


…. मी तुझ्या सोबतच असेन ……

काल पर्यंत मी तुझ्या सोबतच होतो….
आत्ताही मी तुझ्या सोबतच आहे ….
आणि नंतरही मी तुझ्या सोबतच राहील ….

उन्ह्याळ्यात तुझी तहान बनून,
पावसाळ्यात ढगांतून पडणार्या पाण्यात मी असेन,
आणि हिवाळ्यात थंडी बनून मी तुझ्या सोबत असेन…

उजेडात तुझी सावली बनून,
तर अंधारातल्या काळोखात मी असेल,
आणि एकटेपणात तुझ्या मनातला विचार बनून मी तुझ्या सोबत असेन…

हसताना तुझ्या गालावरची खळी बनून….
रडताना तुझ्या प्रत्येक अश्रूत मीच असेन…
आणि रागावशील तेव्हा लाल रंग बनून तुझ्या डोळ्यांत मीच असेन ….

बोलताना तुझ्या आवाजात,
तर लिहिताना तुझ्या प्रत्येक शब्दात मी असेन,
आणि नेहमीच तुझा श्वास बनून ….मी तुझ्या सोबत असेन ….

तुझ्या तळ हातांच्या रेषांत,
tension मध्ये कपाळाच्या आटयात ….
आणि तू गुनगुनत असलेल्या त्या प्रत्येक गाण्यात …. मी तुझ्या सोबतच असेन ….

तुझ्या बंद डोळ्यांतल्या स्वप्नात …
उघड्या डोळ्यातली आशा बनून ….
आणि मनातली इच्छा बनून मी तुझ्या सोबतच असेन …

तुझ्या ट्या प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरात ….
तू विसरलेल्या त्या प्रत्येक आठवणीत ….
आणि तुझ्या प्रत्येक प्रवासात तुझी …”Destination” बनून मी तुझ्या सोबत असेन ….

काल पर्यंत मी तुझ्या सोबतच होतो….
आत्ताही मी तुझ्या सोबतच आहे ….
आणि नंतरही मी तुझ्या सोबतच राहील ….

….. कोणीतरी एकटा …..

जीवन पाण्याशिवाय,

पाणी पावसाशिवाय,

पाऊस सूर्याशिवाय,

सूर्य आकाशगंगेशिवाय,

आकाशगंगा पृथ्वीशिवाय,

पृथ्वी लोकांशिवाय,

लोक जात-धर्मांशिवाय,

जात धर्म मंदिरांशिवाय,

मंदिर देवान्शिवाय,

देव भाक्तांशिवाय,

भक्त हारांशिवाय,

हार फुलांशिवाय,

फूल सुगंधाशिवाय,

सुगंध वार्याशिवाय,

वारा झाडांशिवाय,

झाड निसर्गाशिवाय,

निसर्ग प्रेमाशिवाय,

प्रेम त्यागाशिवाय,

त्याग हृदयाशिवाय,

हृदय आपल्या माणसांशिवाय,

आपली माणसे नात्यांशिवाय,

नाती लग्नाशिवाय,

लग्न आवडीशिवाय,

आवड ओळखीशिवाय,

ओळख नावाशिवाय,

नाव कोणातरी शिवाय

आणि…

कोणीतरी तुझ्याशिवाय …..

एकटा आहे ……

आवडतं तुला आपलं,
एका छत्रीतून जाणं….
हातात तुझ्या पावसाचे थेंब झेलून ….
ते माझ्या चेहर्यावर उडवणं …..

…… तुझ्या सोबत असताना ……

तुझ्या सोबत असताना ,
Boring Movie असताना ,
Flop Actors असताना ,
even Story सुद्धा पकाऊ असताना ,
फक्त तुझ्या एका Smile ने …
Ticket चे पैसे वसूल झाल्यासारखे वाटतात ….

तुझ्या सोबत असताना ,
Traffic jam असताना ,
पाऊस पडत असताना ,
ट्रेन्स सुद्धा नसताना ,
तुझ्या शिवाय या सर्वांमधलं …
काहिसुद्धा लक्षात येत नाही ….

तुझ्या सोबत असताना ,
आपल्या दोघंशिवाय अजुन कोणीही नसताना ,
Time लवकर संपतो ,
म्हणून कधी कधी अस वाटत ,
की त्या वेळी पृथ्वी ला बांधून ठेवावं …
आणि तिचं फिरनं थाम्बवावं …

तुझ्या सोबत असताना ,
Life मधे कितीही Tension असेल तरी ,
काही क्षण एकदम मस्त वाटतात ,
सगळे problems अगदी …
विसरल्यासारखे भासतात …

तुझ्या सोबत असताना ,
Calls receive केले की ,
आपल्या थोड्या वेळाच्या भेटीतला ,
बराच वेळ Waste गेल्यासारखा वाटतो ,
म्हनुनच मी Cell Phone …
Switch Off करून ठेवतो …

तुझ्या सोबत असताना ,
आपण दोघे एकत्र असताना …
कोणी ना कोणी तरी ओळखिचं भेटतच असत ,
म्हनुनच थोड्या वेळासाठी तरी ,
सगळ्या सगळ्यां पासून …
एकदम अनोळखी व्हावं असं वाटतं …

तुझ्या सोबत असताना ,
सगळ विसरायला होत ,
तुला काय सांगायच होत ,
आणि तुझ्याशी काय काय बोलायच होत ,
ते सगळं मला …
तू गेल्यावर आठवत …

तुझ्या सोबत असताना ,
मला वेळेचं भानच नसत ,
चेहर्या वर Smile असत ,
पण मनातल्या मनात …
“कुछ कुछ होता हैं ” म्हणतात ना …
तसं काहीतरी होत असत …

… थोडा वेळ लागेल ……

तू नसशील तरीही चालेल …
थोडे दिवस दुख होइल ,
पुन्हा पहिल्या सारखा हसेल ….
पण त्यासाठी नक्कीच थोडा वेळ लागेल ….

तुझ्या सारखं मलाही कोणीतरी भेटेल ,
कोणीतरी माझी आठवण काढेल ,
कोणीतरी माझी वाट पाहिल …
पण त्यासाठी नक्कीच थोडा वेळ लागेल …

सगळ्याबरोबर असताना आत्ता सारखा मी एकटा नसेल ,
मित्रांमध्ये जमेल ,
Cricket, Football … Basketball …खेळून दमेल …
पण त्यासाठी नक्कीच थोडा वेळ लागेल …

तू मला विसरलीस तसा मी ही तुला विसरेल ,
Past Tense ला सोडून ,
Present Tense मध्ये जगेल …
पण त्यासाठी नक्कीच थोडा वेळ लागेल …

आत्ता सारखीच भरपूर स्वप्न मला पडतील ,
माझे बरेचसे Friends सुद्धा माझ्या सोबत असतील …
आणि त्यात तू नसशील …
पण त्यासाठी नक्कीच थोडा वेळ लागेल …

हिरव्या गार निसर्गाच्या कुशीत मी रमेल ,
रंगन मध्ये रंगेल ,
Adventure Sports सुद्धा Try करेल …
पण त्यासाठी नक्कीच थोडा वेळ लागेल …

तुझं नाव माझ्या “Friends List” मध्ये नसेल ,
Call आणि SMS तर दुरच …
पण तुझा Contact Number सुद्धा माझ्या “Phone book” मध्ये नसेल …
पण त्यासाठी नक्कीच थोडा वेळ लागेल …

……. प्रेम नाही करायच ……

प्रेम कधी करायचं नसतं ….
जाणून बुजून तरी कशाला लफड्यात पडायचं असतं ….

त्यात अंधारातून चालायचं असतं ….
आणि त्याला Destination सुद्धा नसतं …

झोपताना जागायच असतं …
आणि जागेपनी स्वप्नात झोपायचं असतं …

Phone वरुण बोलायचं असतं …
आणि SMS ने Chat करायचं असतं ….

चोरून चोरून … लपून लपून …. भेटायचं असतं …
नेहमीच कुठे ना कुठे तरी फिरायचं असतं …

त्यात Hotels चे Bills pay करावे लागतात ….
विनाकारण Gifts सुद्धा द्यावे लागतात….

पुढे पुढे तर नेहमीच्या मित्राना भेटणं कमी होत ….
घराताल्यांबरोबर सुद्धा बोलणं कमी होत …

मग अचानक प्रेमातून पडल्याचं समजतं ….
आणि Answers मागे सुद्धा Question mark दिसायला लागतं …

पुढे पुढे दुखात मन हसणं विसरतं …
चेहर्यावरच ते कधी कधी थोडसं दिसतं …

त्या दुखातून बाहेर पडायला …
मन नवीन प्रेमाच्या शोधात पळायला लागतं ….

आणि ते कोणी भेटलं की …
“Love cycle” पुन्हा repeat होतं …

म्हनुनच मी कधी प्रेमाच्या लफड्यात पडलोच नाही …
मित्रांच्या अनुभवांमुळे अजुन तरी मी त्यापासून लांब राहिलो आहे …