Tag Archive: Prem


… असचं कधीतरी पावसाळ्यात …

असचं कधीतरी पावसाळ्यात ,
सूर्य मावळताना संध्याकाळी ,
तू मला भेटायला येशील …

थोड्याशा गारव्यात ,
गरम गरम Coffee पिताना ,
तू माझ्याबरोबर बराच वेळ गप्पा मारशील …

Hotel च्या पायर्या उतरताना ,
तुझा पाय लचकला तर ,
तू अलगद तुझा हात माझ्या हातात देशील …

रस्त्याने चालताना ,
अचानक पावसाच्या सरी कोसळायला लागल्या ,
की तू मला तुझ्या छात्रित बोलावाशील …

पावसाच्या पडणार्या थेंबांना ,
तू तुझ्या गोर्या हातांत झेलशिल ,
आणि हळूच त्याना हसत हसत हवेत उड़वशील …

थोडीशी भिज़लेली ,
थंडीने थोडीशी गारठलेली तू …
… तू त्या पावसात किती सुंदर दिसशील …

अशातच अचानक ढग गडगडले ,
थोडीशी वीज कडाडली की ,
त्यांना घाबरून तू मला बिलगशील …

घरी जायला उशीर होइल ,
या भीतीने तू घाबरशील ,
पण पुन्हा भेटायचं वचन देऊन जाशील …

असचं कधीतरी पावसाळ्यात ,

सूर्य मावळताना संध्याकाळी ,
तू मला भेटायला येशील …
… मी वाट पाहतोय ,
Hope तू मला Call करशील ….


……. माझं तुझ्यावर प्रेम नाही…

नेहमी तुझ्याशी बोलावसं वाटतं ,
तुला मनातल सगळं सांगावसं वाटतं ,
तुझ्याबरोबर बोलल्यावर फार छान वाटतं ,
आणि तू …. तू फक्त माझ्याबरोबर बोलत राहवसं वाटतं ….
कारण तू …… तू माझा चांगला मित्र आहेस …..
पण नाही रे …. माझ तुझ्यावर अजिबात प्रेम नाही ….

तुला नेहमी पाहवसं वाटतं ,
तुझ्याबरोबर कुठेतरी लांब फिरायाला जावसं वाटतं ,
तुझा सहवास नेहमी भेटावासा वाटतो ,
तुझा स्पर्ष देखिल मला हवाहवासा वाटतो ,
..कारण तू …… तू माझा चांगला मित्र आहेस …..
पण नाही रे …. माझ तुझ्यावर अजिबात प्रेम नाही …

तू नसताना एकटेपणा जाणवतो ,
भरपूर आनंदात देखिल … राडावसं वाटतं ,
तूच माझ्या सर्वात जवाळचा आहेस ….
तुझ्यावरच माझा सर्वात जास्त विश्वास आहे …
…कारण तू …… तू माझा चांगला मित्र आहेस …..
पण नाही रे …. माझ तुझ्यावर अजिबात प्रेम नाही ….

…माझे म्हनने एकदा ऐकून बघ…

माझे म्हनने एकदा ऐकून तरी बघ ,
प्रेम माझ्यावर एकदा करुन तरी बघ …

सगळेच म्हणतात , मी तुझ्यासाठी चंद्र तारे घेउन येतो ,
त्यापेक्षा मी तुला चंद्र तार्यांवरच घेउन जातो …
पण माझे म्हनने एकदा ऐकून तरी बघ ,
प्रेम माझ्यावर एकदा करुन तरी बघ …

मग आपनदेखिल चोरून चोरून भेटुया ,
लपून लपून मोबाइल वर बराच वेळ गप्पा मारुया …
पण माझे म्हनने एकदा ऐकून तरी बघ ,
प्रेम माझ्यावर एकदा करुन तरी बघ …

तुला जर कधी एकटेपना भासेल तर ,
फक्त माझी आठवण कर मी तुझ्या जवळच असेन …
पण माझे म्हनने एकदा ऐकून तरी बघ ,
प्रेम माझ्यावर एकदा करुन तरी बघ …

माझ्याशी बोलताना तू तुझे मन मोकळे करशील ,
आलेच तुझे अश्रु तर ते मी पुसेन …
पण माझे म्हनने एकदा ऐकून तरी बघ ,
प्रेम माझ्यावर एकदा करुन तरी बघ …

तुझ्या दुःखात मी सुद्धा तुझ्या बरोबर असेन ,
पण माझ्या बरोबर असताना तुला दुखाची जाणीवच नसेन …
आता तरी माझे म्हनने एकदा ऐकून बघ ,
प्रेम माझ्यावर एकदा करुन बघ ……माझे म्हनने एकदा ऐकून बघ…

माझे म्हनने एकदा ऐकून तरी बघ ,
प्रेम माझ्यावर एकदा करुन तरी बघ …

सगळेच म्हणतात , मी तुझ्यासाठी चंद्र तारे घेउन येतो ,
त्यापेक्षा मी तुला चंद्र तार्यांवरच घेउन जातो …
पण माझे म्हनने एकदा ऐकून तरी बघ ,
प्रेम माझ्यावर एकदा करुन तरी बघ …

मग आपनदेखिल चोरून चोरून भेटुया ,
लपून लपून मोबाइल वर बराच वेळ गप्पा मारुया …
पण माझे म्हनने एकदा ऐकून तरी बघ ,
प्रेम माझ्यावर एकदा करुन तरी बघ …

तुला जर कधी एकटेपना भासेल तर ,
फक्त माझी आठवण कर मी तुझ्या जवळच असेन …
पण माझे म्हनने एकदा ऐकून तरी बघ ,
प्रेम माझ्यावर एकदा करुन तरी बघ …

माझ्याशी बोलताना तू तुझे मन मोकळे करशील ,
आलेच तुझे अश्रु तर ते मी पुसेन …
पण माझे म्हनने एकदा ऐकून तरी बघ ,
प्रेम माझ्यावर एकदा करुन तरी बघ …

तुझ्या दुःखात मी सुद्धा तुझ्या बरोबर असेन ,
पण माझ्या बरोबर असताना तुला दुखाची जाणीवच नसेन …
आता तरी माझे म्हनने एकदा ऐकून बघ ,
प्रेम माझ्यावर एकदा करुन बघ …

……. प्रेम म्हणजे प्रेम ………….


प्रेम म्हणजे प्रेम ,
त्यात आयुष्याचा गेम


प्रेमाचा नसतो नेम ,
गाढव आणि प्रेमी दोघे एकदम सेम …

प्रेमात कोणी जूळत,
तर कोणी पूर्णपणे विखरत …

प्रेमात कोणी तळा पर्यंत बुडून जात् ,
तर कोणी प्रेमावरच तरंगत …

प्रेम दाखवते अनेकांना आशा ,
पण होते बर्याचदा निराशा …

फिरायच्या असतात बर्याच दिशा ,
पण फाटक्या पाकिटाच्या दशा .

प्रेमात स्वप्ना दिसतात ,
प्लॅटफॉर्मवरुन बर्याच ट्रेन्स सूटतात …

आधी रुस्तात मग हसतात ,
जवळची नाती तुटतात …

………..शब्द……….

शब्दांच आणि आपलं नात् कस असतं ,
शब्दांन्शिवाय जगन काय मरण सुद्धा जमल नसत …

शब्द कात्री सारखे असतात,
जन्मभरच्या नात्यांचा धागा सहजच कापून टाकतात …

शब्द दगडा सारखे असतात ,
लक्ष्य नसताना आपल्याला ठेस मारून जखमी करतात …

शब्द गुलाबाच्या फुलांसारखे असतात ,
सुंदर दिसतात, सुवासिक देखिल असतात पण त्यांनाही काटे असतात…

शब्द काट्यांसारखे असतात ,
अवघड वाटेवरून चालताना पायात रुततात …

शब्द चापलांसारखे असतात ,
उन्हात चालताना निदान पायाला चटकेतरी लागू दीत नाहित …

शब्द तलवारिसारखे असतात ,
म्यानातून काढल्यावर वाद निर्माण करतात …

शब्द दिव्यांसारखे असतात ,
अंधारात प्रकाश देऊन मार्ग दाखवतात …

शब्द चाकांसारखे असतात ,
एकाच Axis भोवती फिरत असतात …

शब्द घडयाळांसारखे असतात ,
आपल्या जवळ असतात पण आपल्या हातात नसतात …

शब्द औशधांसारखे असतात ,
कडू असतील तरी घ्यावीच लागतात…

शब्द Injection सारखे असतात ,
घेताना दुखतात पण तेच आपल्याला लवकर बरे करतात…

शब्द बंदुकितुन निघालेल्या गोळी सारखे असतात ,
एकदा सोडल्यावर परत येत नाहीत् …

शब्द Ball-Pen सारखे असतात ,
लिहिता येतात आणि खोडलेतरी दिसतात …

शब्द नात्यांत असतात , शब्द भांडनात असतात ,
शब्द शब्दांत असतात , शब्द सगळ्यांतच असतात ….