Tag Archive: हास्य कविता


 

बायको..  तुझा माझ्यावर Love नाय काय.. नाय काय..
डोळे बघ माझे किती गोल गोल.. गोल गोल..
प्रेम बघ त्याच्यात किती खोल खोल.. खोल खोल..
खोलवर एकदा पोहून बघ.. पोहून बघ..
प्रेम माझ्यावर करून बघ.. करून बघ..

बायको..  तुझा माझ्यावर Love नाय काय.. नाय काय..
Guy बघ मे किती shy shy.. shy shy..
दिसायला मे किती smart हाय.. smart हाय..
Personality पण माझी नीट बघ.. नीट बघ..
प्रेम माझ्यावर करून बघ.. करून बघ..

बायको..  तुझा माझ्यावर Love नाय काय.. नाय काय..
बोलतो बघ मे किती गोड गोड.. गोड गोड..
बाकीचं tension तू सोड सोड.. सोड सोड..
स्वप्नांत पण तू only positive बघ.. positive बघ..
प्रेम माझ्यावर करून बघ.. करून बघ..

बायको..  तुझा माझ्यावर Love नाय काय.. नाय काय..
तुझ्यासाठी आणली मी साडी.. साडी..
सोबत आहे जिलेबी ची गोडी.. गोडी..
बेसन लाडूची पण तू taste बघ.. taste बघ..
प्रेम माझ्यावर तू करून बघ.. करून बघ..

बायको..  तुझा माझ्यावर Love नाय काय.. नाय काय..
करतो की नाही तुझी care.. care..
I dare for you.. I don’t fear.. fear..
Test माझी तू घेऊन बघ.. घेऊन बघ..
प्रेम माझ्यावर तू करून बघ.. करून बघ..

बायको..  तुझा माझ्यावर Love नाय काय.. नाय काय..
तुझ्यासाठीच लिहिली ही poem.. poem..
सोनू ची लावली मी rhythm.. rhythm..
तालात तू एकदा वाचून बघ.. वाचून बघ..
प्रेम माझ्यावर तू करून बघ.. करून बघ..

बायको..  तुझा माझ्यावर Love नाय काय.. नाय काय..
आता तरी Stop saying “I hate you..”.. hate you..
बोल ना मग मला तू “Love you..” Love you..
विश्वास माझ्यावर तू ठेऊन बघ..
प्रेम माझ्यावर तू करून बघ.. करून बघ..
Advertisements

…… सडकछाप “Poetरी” …..

I saw her yesterday… She was wearing a saari ….

She was looking लई भारी …

That was the moment I decided that …

she is that नारी …

I must marry…

She was standing on a bus stop ….

wearing a green top ….

she made my heart beat stop …

for next five days she was in my dreams … non-stop …

She was busy on a call …

looking like a झक्कास माल …

देख के मेरा दिल हुआ बेहाल …

लगने लगा उसका घर मेरा ससुराल …

She was walking on the road …

I like her smile …  so I told her …

के यार मुझसे रिश्ता जोड …

मेरे लिये ये जग छोड …

हा बोल … मेरा दिल मत तोड …

she looked at me and smile …

we had eye contact … just for a while …

that shoots my heart like a missile ….

I follow her for about a mile ….

She was a teacher in a school …

was looking very beautiful …

I gave her rose का फूल …

I said her “में तेरे प्यार मे सब गया भूल “….

….. मला पुन्हा शाळेत जायचय ….शाळेचे ते दिवस आठवले की …

उगीचच मोठं झाल्यासारखं वाटतं ….

bus -stop ची मागची ती शाळा पाहून ,

पुन्हा शाळेत जावसं वाटतं ….


शाळा आमची छान होती …

Last bench वर आमची team होती ….

Cricket च्या वेळी ground वर cheating व्हायची …

आणि मधल्या सुट्टीत कॅन्टीन मधल्या वडा-पाव साठी ….

साला नेहमीच line असायची …


जन-गण-मन ला कधी कधी ..

शाळे बाहेर सुद्धा उभे रहायचो …

प्रतिज्ञेच्या वेळी हाताला टेकू देऊनही ….

प्रतिज्ञा म्हणायचो …

प्रार्थनेच्या वेळी मात्र …. सगळ्यांसारखे …

नुसतेच ओठ हालवायचो ….


पावसाळ्यात शाळेत जाताना ,

छत्री दप्तरात ठेऊन …. मुद्दामच भिजत जायचं …

पुस्तक भिजू नये म्हणून ….

त्याना पिशव्यांमध्ये ठेवायचं ….

शाळेतून येता येता … एखाद्या डबक्यात उडी मारून …

उगीचच सगळ्यांच्या अंगावर पाणी उडवायचं ….


Black -board वर बोलणार्या मुलांमध्ये ….

Monitor नेहमीच आमचं नाव लिहायचा …

नेहमीच्याच incomplete गृपाठामुळे …

हातावर duster चा व्रण असायचा ….

प्रयेत्येक Off -period ला P.T. साठी ….

आमचा आरडाओरडा असायचा …

शाळेतून घरी येताना शाळेबाहेरचा ….

तो बर्फाचा गोळा संपवायचा ….


मुलीं बरोबर कितीही बोललो तरीही ….

कधी कोणी link नाही लावायचं …

प्रत्येक महिन्यातून एकदातरी …

डोक्यावरचे केस कापायचो …

आणि आज-काल सारख्या प्रत्येक वाक्यात ….

शिव्या सूद्धा नाही द्यायचो …


इतिहासात वाटतं …. होता शाहिस्तेखान …

नागरिक शास्त्रात पंतप्रधान ….

गणित… भुमितीत होतं … पायथागोरस च प्रमेय …

भूगोलात वाहायचे वारे …. नैऋत्य … मॉन्सून …

का कुठलेतरी … वायव्य….

हिंदीतली आठवते ती “चिंटी कि आत्मकथा”

English मधल्या grammar नेच झाली होती आमची व्यथा …


शाळेतल्या gathering चा dance …

बसल्या बसल्या झोपान्यासाठीचा … तो मराठी चा तास ….

दरवर्षी नवीन भेटायचे ….

Uniforms आणि वह्या पुस्तकांचा set …..

पण नवीन दप्तरासाठी नेहमीच करावा लागायचा wait ….


शाळा म्हटली कि अजूनही आठवतात ….

desk वर pen ने त्या “pen fights” खेळणं ….

exams मधल्या … रिकाम्या जागा भरणं … आणि जोड्या जुळवणं …

चिखलातल्या त्या football च्या matches …

कबड्डीत … पडून धडपडून ….

हातापायांवर आलेले scraches …


खरच कंटाळा आलाय या मोठेपणाचा ….

मला पुन्हा लहान व्हायचं ….

हसायचं …. खेळायचं ….

मला पुन्हा शाळेत जायचं ….


बे एके बे,

बे दुने चार,

अपुन को तेरेको बोलणे का है ….

I love you यार …

बे त्रिक सहा,

बे चौक आठ,

हो म्हण नाहीतर ….

मी लावून टाकेन वाट ….


बे पंचे दहा,

बे सक बारा,

माझ्यासारखा dashing hero …

तुला भेटणार नाही दुसरा ….


बे साती चौदा,

बे आठी सोळा,

famous आहे area मध्ये …

आहे मी पोरगा साधा भोळा …


बे नवे अठरा,

बे दाहे वीस,

कोणी दुसरा असेल तर नाव सांग …

त्याचे करतो cut piece ….बे एके बे ,
बे दुने चार …
वेडा झालो मी …
जेव्हा पाहिलं तुला यार ….

बे त्रिक सहा ,
बे चोक आठ ,
रात्रं दिवस करत राहतो तुझाच विचार …
मला वाटतं आता लागली माझी वाट …

बे पंचे दहा ,
बे सक बारा ,
प्रेमाबिमाचा लफडा …
वाटतो मला हा सारा ….

बे साती चौदा ,
बे आठी सोळा ,
फसवणार नाही तुला कधीच…
आहे मी साधा भोळा …

बे नवे अठरा,
हो म्हण मला …
माझा करू नको बकरा …

नाही म्हणशील मला तर …
नंतर करत राहशील मला miss …
आहे बे दाहे वीस ….

…… मी प्रेमात पडलो ……..त्या दिवशी मी,

प्रेमात पडलो,

बरंच लागलं,

पण रक्त … जखम वगैरे काही नाही दिसलं….


तिने हसून माझ्याकडे पाहिलं,

आणि मी तिच्या डोळ्यातच हरउन  गेलो …

तिच्या काळ्या काळ्या केसांत ….

मी स्वतः ला गुंतून बसलो ….

तेव्हा पासून मला Newton’s Law ,

चुकीचा वाटायला लागला..

force of Gravity चा law लिहिताना,

तो थोडासा चुकला ….

Apple झाडावरून सरळ….

जमिनीवरच पडलं,

पण प्रेमात पडल्यापासून….

मला हवेत असल्या सारखं वाटायला लागलं….


रात्रीच्या स्वप्नात…

तिला पाहिलंच …

पण दिवस भर उघड्या डोळ्यात,

तिचंच स्वप्नं दिसत राहिलं …


आज-काल मला पावसात भिजावंसं वाटतं …

जुहू चौपाटी च्या वाळूवार चालावंसं वाटतं,

Bandstand वर तिच्या सोबत बसावंसं वाटतं …

Hiranandani Gardens मधेय फिरावंसं वाटतं …

त्या दिवसापासून मला ….

“कुछ कुछ होता है” वगैरे वाटयाला लागलंय ….

त्यात अजून काय तर ….

मला “दिल तो पागल है” सारखं गाणं पण

आवडायला लागलंय ….


तेव्हापासून माझं मन “Rocky ” मधल्या संजय दत्त सारखं …

तिच्या शिवाय कुठेपण लागत नाही आणि वेळ पण जात नाही …

मी “मोहब्बते” मधल्या जिम्मी शेरगिल सारखा …

चालता चालता थांबतो … तर बसल्या बसल्या कुठेतरी हरउन जातो …


tweeter वर पण आज-काल मी फक्त …

“Love Quotes”च tweet करतो….

माझा Facebook वरचा status पण …

असाच काहीतरी असतो ….

दिवसा गुलाबी ढगांत ….

लाल लाल सूर्य मला भासतो ….

तर रात्री … रंग बिरंगी .. तारे आणि चंद्रा सोबत ….

तिचाच चेहरा मला दिसतो …


प्रेमात पडल्यापासून मी ….

जरा विचित्रच वागायला लागलोय ….

गप्पं गप्पं बसायला लागलोय ….

पण मनातल्या मनात …

वादळांना सामोरे जायला लागलोय ….
…. मी प्रेमातून पडलो ….


प्रेमात पडलो,

हवेत उडलो,

सोबत फिरलो,

movies ला गेलो,

देवळात आलो,

प्रेमगीते गायलो,

स्वप्नात रमलो,

ढगांत शिरलो,

तिच्यासाठी जगलो,

कितींदातरी  मेलो,

मागे मागे धावलो,

वेळेवर पोहचलो,

Platform वर थांबलो,

चौपाटी वर बसलो,

पावसात भिजलो,

तिच्या डोळ्यांत दिसलो,

तिच्या हसण्यात हरवलो,

केसांत गुंतलो,

स्पर्शात संपलो,

खरा समजलो,

खोटं बोललो,

थोडासा हसलो,

मनातच नाचलो,

तरी भरपूर रडलो,

ईशार्या ईशार्यांत खेळलो,

Arguments मध्ये हरलो,

बोलून बोलून दमलो,

Problems मध्ये फसलो,

लोच्यांत अडकलो,

लफडी जिंकलो,

पण राड्यांत पडायला थोडा घाबरलो,

रात्रभर जागलो,

Lecturer’s ला झोपलो,

सोबत राहिलो,

कधीच एकटा नाही चाललो,

तिच्या शिवाय बाकी सगळं विसरलो,

मित्रांना नडलो,

घरातल्यांबरोबर भांडलो,

पण शेवटी ……

जेव्हा प्रेमातून पडलो ……

तेव्हा कुठे खरं प्रेम करायला शिकलो ….!!!


….. कोणीतरी एकटा …..

जीवन पाण्याशिवाय,

पाणी पावसाशिवाय,

पाऊस सूर्याशिवाय,

सूर्य आकाशगंगेशिवाय,

आकाशगंगा पृथ्वीशिवाय,

पृथ्वी लोकांशिवाय,

लोक जात-धर्मांशिवाय,

जात धर्म मंदिरांशिवाय,

मंदिर देवान्शिवाय,

देव भाक्तांशिवाय,

भक्त हारांशिवाय,

हार फुलांशिवाय,

फूल सुगंधाशिवाय,

सुगंध वार्याशिवाय,

वारा झाडांशिवाय,

झाड निसर्गाशिवाय,

निसर्ग प्रेमाशिवाय,

प्रेम त्यागाशिवाय,

त्याग हृदयाशिवाय,

हृदय आपल्या माणसांशिवाय,

आपली माणसे नात्यांशिवाय,

नाती लग्नाशिवाय,

लग्न आवडीशिवाय,

आवड ओळखीशिवाय,

ओळख नावाशिवाय,

नाव कोणातरी शिवाय

आणि…

कोणीतरी तुझ्याशिवाय …..

एकटा आहे ……

….. प्रिये तुझ्या साठी ….


प्रिये तुझ्या आठवनित  काल चालत होतो …
तेव्हा एका Bike ने मला ठोकले …
हाताला जखम झाली आणि भरपूर रक्त वाहू लागले …
रक्त वाया जाऊ नए म्हणून,
मी त्यानेच Love letter रखडले …
या सगळ्या लफड्या नंतर…
मी डॉक्टर कड़े गेलो …
त्याने पाच टाके लावले आणि,
बिलाचे पाचशे रूपये घेतले …


प्रिये तू माझ्यात interested आहेस या नादात …
मी नेहमीच तुला call करत राहिलो…
तुझा Reply नाही आला …
तरीही मी SMS करत आहिलो …
महिन्याभाराचा balance माझा,
आठवडयातच संपायला लागला …

प्रिये तुझ्या साठी…
मी गुलाबाचं झाड लावणार आहे,
तुझा मला होकार असेल तर …
तुझ्या केसांत गुलाब लावणार …
नाहीतर फूलवाला बनून …
माझे balance चे पैसे वसूल करणार आहे …

प्रिये तुला भेटायला मी तुझ्या घरी येणार आहे …
तुझ्या घरातल्यांना मी आवडलो तर …
तुला मी perfume gift देणार …
आणि नाही आवडलो तर salesman बनून …
फेनोइल आणि Detergent विकून माझे…
Perfume चे पैसे वसूल करणार आहे …

प्रिये तुझ्या आठवनित मी …
एक chicken shop उघडणार आहे …
तुझ्यावरचा राग …
मी तिथल्या कोम्बड्यां वर काढणार आहे …
पण तिथल्या अंड्यांना मी …
माझ्या मनातल्या प्रेमासारखी जपनार आहे …

बघ तुला आठवतात काय ते Pizza Hut’s चे pizzas …
आणि CCD ‘s च्या coffees ….
Natural’s च्या त्या ice -creams …
आणि मी तुला सांगितलेल्या त्या माझ्या Day dreams …

प्रिये आपली झालेली प्रत्येक भेट …
मला सुखद आठवण देऊन गेली …
पण प्रत्येक वेळी माझ्या पाकिटातली …
at least १०० रुपयांची नोट घेउन गेली ….
…. हीच Engineering आहे तर ….

“यही ज़िन्दगी हैं तो क्या ज़िन्दगी हैं ….” ह्या traffic signal मधल्या गान्यावरून काहीसं inspired होउन मी ही कविता लिहली आहे …

…. हीच Engineering आहे तर ….


…. हीच Engineering आहे तर ….
ही काय इंजीनियरिंग आहे …?
कुठे admissions च्या रांगेत सुरु होते …
कुठे घरांत पुस्तकांची रद्दी वाढवते …
कुठे रॉकेल xerox च्या वासात गुदमरते …

…. हीच Engineering आहे तर ….
ही काय इंजीनियरिंग आहे …?

कुठे mechanics बनून Friction करते …
कुठे maths बनून integrate करते …
कुठे probability बनून सांभाळुन घेते …
कुठे chemistry च्या reactions करते …

…. हीच Engineering आहे तर ….
ही काय इंजीनियरिंग आहे …?

कुठे physics चे laws विसरते …
कुठे transistor च्या emitter- collector मध्ये confuse होते …
कुठे frequency bands मध्ये अड़कुन पड़ते…
कुठे physical memory नेहमीच full असते …

…. हीच Engineering आहे तर ….
ही काय इंजीनियरिंग आहे …?

कधी assignments बनून बरसत असते …
कधी free lecture साठी तडपत असते …
कधी submissions च्या वेळी वाट लावते …
कधी लिहून लिहून बोटांना फोड़ आणते …

…. हीच Engineering आहे तर ….
ही काय इंजीनियरिंग आहे …?

कधी चालु lecture मध्ये झोपते …
कधी रात्री रात्री जागवून घालवते …
कधी वेळे पेक्षा जोरात धावते …
कधी अशीच थांबून धावत्या वेळेकडे पाहत राहते …

…. हीच Engineering आहे तर ….
ही काय इंजीनियरिंग आहे …?

कधी KT बनून दुखावत राहते …
कधी Golden attempt बनून सतावते …
कधी circuit मधल्या current सारखी भटकत राहते …
कधी drop बनून भरपूर रडवते …

…. हीच Engineering आहे तर ….
ही काय इंजीनियरिंग आहे …?

कधी vivas च्या वेळी निःशब्द करते …
कधी practicals च्या वेळी साध्या साध्या readings चुकवते …
कधी theory exams साठी रात्रं दिवस जागवते …
तरी papers मध्ये कुठेतरी काहीतरी कमी राहते …

…. हीच Engineering आहे तर ….
ही काय इंजीनियरिंग आहे …?

कधी results च्या वेळी भीती ने घाबरवते …
कधी तुटलेल्या स्वप्नांत टोचत राहते …
कधी job साठी डोळ्यांत पाणी आणते …
नेहमीच future च्या प्रश्नांत present ला मागे सारते …

…. हीच Engineering आहे तर ….

ही काय इंजीनियरिंग आहे …?…..