Category: मराठी कविता


from Instagram: http://ift.tt/2pcfh2I

​ए …. ऐक ना….

ए …. ऐक ना….
 … तुझं असं बघणं….
नको बघत जाऊस ना…. तू असं मला….
असच कधी…. घायाळ करशिल तु मला…
तुझ्या या नजरेने… जखम होईल या जीवाला….

ए …. ऐक ना….
ए…. तुझं हे हसणं ….
माझ्या चेहर्यावर ….. घेवुन येतं हसु…
असच कधी…. वेडं करशिल तु मला…
तुझ्या या हसण्याने… लागेल वेड या जीवाला….

ए …. ऐक ना….
ए…. तुझे हे डोळे…
नको ते cute से डोळे मिचकवु….
मनात माझ्या तु तुझ घर बनवु…
असच कधी… तुझच करशिल तु माझं मन…
तुझ्या या डोळ्यांनी…. घेवुन जाशिल तु माझं हे मन…

ए …. ऐक ना….
ए …. तुझ बोलणं….
नको बोलुस एवढ्या प्रेमाने… 
ऐकु येतो मला तुझा आवाज तु नसताना
असच कधी… होउन जाईल मी तुझ्या शब्दांचा दिवाना…
तुझ्या शब्दांमध्ये…. अडकुन जाईल मी तु बोलताना…

ए …. ऐक ना….
ए ….. किती काळजी घेतेस रे…
नको घेऊस माझी एवढी काळजी…
तुझ्या असण्यातच असेल मी…
असच कधी… मला तुझ्या अधाराचाच आधार राहील..
रु नसताना… विखरून जाईल मी…

ए… ऐक ना…
ए… किती साथ देतेस तू मला…
नको देऊस एवढी साथ माझी…
असच कधी… माझ्या सावलीत तुला शोधेल मी…
तुझ्या शिवाय … सगळ्यांत असूनही एकटा राहील मी…

आज खुप दिवसांनी तुला पाहिलं..

आज खुप दिवसांनी तुला पाहिलं..
Don’t know what & why….
But… हृदयात काहीतरी pause झाल्यासरखं वाटलं….
तुला पाहता क्षणी मन तुझ्याकडे वळु लागलं ….
But…. मेंदूने सांगितलं…. थांब ….. तिथेच थांब….
बघ तिने तुला ignore केलं…
ते समजता क्षणी मनाला खुप वाइट वाटलं….
पण पाउलांनी …. स्वतः ला सावरलं…
बरं…. कितीही झालं तरी डोळे ….
डोळ्यांना नाही आवरता आलं….
त्यांतुन येणाऱ्या पाण्याच्या थेंबांना नाही थांबवता आलं…..
मग….. कुठून तरी मन …
जुन्या अठवणींच्या रस्त्यावर चालु लागलं…
चालता … चालता त्या अठवणींच्या रस्त्यावर….
डोळे पूर्ण भरून आले….
आपलं तेव्हाचं लपून लपून भेटनं…..
खुप वेळ अश्याच गप्पा मारनं….
तुझं हसनं….
तू तुझे problems माझ्याशी share करणं….
मग मी इथून तिथून काहीतरी search – research करून …
तुझ्या problems चे solutions शोधून तुझ्यासाठी आणनं…..
तसही तुला मी life मध्ये फक्त problems असतानाच लक्षात यायचो….
hmmm…. म्हणजेच… आता तुझ्या लाइफ मध्ये problems तरी नाही ….
or त्यांच्या solutions साठी तुझ्याकडे कोणीतरी आहे….
हे मात्र मनाला लगेच पटलं…..
त्यातच तू ignore केल्याचं reason मनाला समजलं …..
तुझ्यासारख्या selfish व्यक्तीचं example भेटलं…..
आणि बरं झालं तू इथवरच माझ्या नशिबात होती ….
याचं समाधान मला शेवटी मिळालं….

मला पाऊस जाम आवडतो….

पावसाळ्यात लोकांना traffic चा त्रास असतो…
trains मध्ये गर्दी असते….
रसत्यात चिखल आणि गल्ली गल्लिमधल्या घरांत पानी साचलेल असतं…
मला पावसात हसताना पाहुन….
मला विचारतात तुला पाऊस का आवडतो….!
तेव्हा मी बराच केला ….

जेव्हा पावसात रसत्यात चिखल साचतो….
चिखलात तू स्वताला सावरते….
चिखलात सावरत सावरत…..
छत्री सांभाळत सांभाळत ….
जेव्हा तू चालते….
तेव्हा सावरलेली तू ….खुप छान दिसते….
म्हणून मला पाऊस जाम आवडतो…..

जेव्हा पावसात जोरात वारा येतो….
त्या वार्याने तुझी छत्री उलटी होऊन तू भिजते….
त्यावेळी पावसावर वैतागलेली….
आणि स्वतावर हसलेली तू खुप छान दिसते….
म्हणून मला पाऊस जाम आवडतो…..

जेव्हा पावसात रस्त्यांवर पाणी साचतं ….
त्यावेळी एखादी गाडी तुझ्या नकळत …
तुझ्यावर पाणी उडउन तुला भिजउन जाते….
तेव्हा त्या driver वर रागावालेली….
तू खुप छान दिसते….
म्हणून मला पाऊस जाम आवडतो…..

जेव्हा पावसात नाचावसं वाटतं….
तेव्हा तू खुप खुश होऊन पावसात नाचते…
लहान मुलांसारखि बागड़ते….
तेव्हा त्या पावसात मनापासून हसलेली तू खुप छान दिसते…
म्हणून मला पाऊस जाम आवडतो…..

जेव्हा अचानक पाऊस येतो …
सगळे जग त्याच्या ओलाव्याने भिजते….
अशाच पावसात ओलीचिंब भिजलेली…
ठंडी ने शहारलेली तू खुप छान दिसते….
म्हणून मला पाऊस जाम आवडतो…..

जेव्हा पाऊस विजांचा कड़कडाट करतो….
विजांच्या कडकडाटाने तु घाबरते….
आणि त्यांना घाबरुन तू माझ्या मिठीत येते…..
घाबरलेली तू माझ्या मिठीत… किती सुंदर दिसते…
म्हणून मला पाऊस जाम आवडतो…..

…. प्रेम तर व्हायचंच होतं ….. 

 

 

प्रेम तर व्हायचंच होतं… 

लफड्यात तर पडायचंच होतं …. 

try तर बरंच केलं मी …. 

पण जे कुणीतरी लिहून ठेवलंय ते तर व्हायचंच होतं …. 

प्रेम तर व्हायचंच होतं…… 

 

रात्रीचं जगायचं होतं …. 

Whole day ढगांत तरंगायचं होतं …. 

कोणाच्यातरी नादात…. 

mobile चे bills भरायचे होते…. 

प्रेम तर व्हायचंच होतं…

 

काम धंद्यांचे वांदे व्हायचे होते …. 

appraisal list मधून नाव delete व्हायचे होते …. 

overtime चे income संपून …

half-day चे deductions व्हायचेच होते …. 

प्रेम तर व्हायचंच होतं…. 

 

बंद डोळ्यांत स्वप्नं …. 

आणि उघड्या डोळ्यांतून पाणी तरंगायचंच होतं …. 

गर्दीत एक एकट वाटायचंच होतं …. 

हसता हसता चुकून रडायचंच होतं …. 

प्रेम तर व्हायचंच होतं….. 

 

कोणाच्या तरी आठवणीत संपूर्ण दिवस waste करायचाच होता …. 

कोणाचातरी चेहरा डोळ्यांसमोर ठेऊन …. 

कागदांवर दोन चार lines लिहायच्याच होत्या …. 

कश्यातरी rhyme करून …… 

यासारख्या पोएम्स बनयच्याच होत्या …. 

प्रेम तर व्हायचंच होतं…

 

 

…. स्वप्न ….


स्वप्न ….. स्वप्न कशी असतात … म्हणजे सगळ्यांसाठी वेगवेगळी असतात …. पण प्रत्येक जन त्याला कश्या बरोबर तरी compare  करतो …. माझ्या काही मित्राना विचारला तर त्यांनी सांगितलं … “Dreams are those which can never turn into reality” … Dreams are Uncontrolled” …. “Dreams can sometimes turn into reality” …. “Dreams is is the our place of having whatever we want…”…. स्वप्न ….


स्वप्न आकाशातल्या काळ्या ढगांसारखी असतात ….
जसे आकाशात काळे ढग दाटून आले कि पाऊस पडतो ….
कोरड्या डोळ्यांत स्वप्न दाटून आली कि …
डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागातात ….


स्वप्न समुद्र किनार्यावर बांधलेल्या …..
वाळूच्या बंगाल्यांसारखी असतात ….
कितीही सुंदर असली तरी …
पाण्याची एक लाट त्यांना पुन्हा ….. 
वाळूत लपउन टाकते …. 


स्वप्न “प्रेम प्रकरणा” सारखी असतात ….
हसवतात …. रडवतात …..
दिवस रात्र जागवतात ….
भरपूर वेळा तुटतात  …. 
पण थोडा दुख संपला कि ……
पुन्हा डोळ्यांसमोर नव्याने उभी असतात ….


स्वप्न break  fail झालेल्या cars सारखी असतात …. 
अगदी Uncontrolled  …..
कितीही ताकत लाऊन breaks  लावले तरी नाही थांबत ….
आणि शेवटी कुठल्यातरी दिवाळाला आदळूनच थांबतात …


स्वप्न “Adobe  Photoshop ” सारखी असतात ….
कुणालाही कुठे हि थांबू देतात …
कोणाही सोबत राहू देतात ….
पण workload  असताना open  केला तर ….
System  hang  करतात ….


स्वप्न प्रश्ना सारखी असतात ….
Unanswered  ….
Unknown  ….
always  new …..
पण बर्याच वेळा त्यांचे answers  same  असतात … 


स्वप्न पाण्या सारखी असतात ….
तहान भागउ  सकतात ….
त्यात भिजउ शकतात ….
तरंगउ शकतात ….
पण पोहत पोहत किनारा गाठायला ….
भरपूर मेहनत करून घेतात ….


स्वप्न आपल्या जुन्या मित्रां सारखी असतात …
जेव्हा भेटू तेव्हा … एकदम छान feel  करून देतात ….
कितीही tenssion  असला तरी ….
त्यांच्या सोबत असताना …..
life  अगदी smooth  असल्यासारखी feeling  देतात ….

….प्रेम म्हणजे काय???…..कुणीतरी आवडणं म्हणजे प्रेम की …
कोणाच्या डोळ्यात हरउन जाणं म्हणजे प्रेम …

कोणालातरी सारखं पाहत रहावसं वाटणं म्हणजे प्रेम की …
कोणालातरी विसरता न येणं म्हणजे प्रेम ….

कोणाची तरी प्रत्येक गोष्ट आवडणे म्हणजे प्रेम की …
आपली आणि कोणाच्या तरी आवडी जुळणे म्हणजे प्रेम …

कोणी स्वप्नांत येणं म्हणजे प्रेम की …
कोणाच्या सहवासात … स्वप्न जगल्यासारखं वाटणं म्हणजे प्रेम …

कोणावर विश्वास ठेवणे म्हणजे प्रेम की ….
कोणाचातरी विश्वास कधीच न तोडणे म्हणजे प्रेम ….

कुणाला माफ करणे म्हणजे प्रेम की ….
कुणाची तरी उगीचच माफी मागणे म्हणजे प्रेम ….

कुणाकडून काही घेणं म्हणजे प्रेम की ….
न मागता कोणाला काहीतरी देणं म्हणजे प्रेम ….

कोणासाठीतरी रडणारं मन म्हणजे प्रेम की ….
कुणाच्या तरी आठवणींत हसणारं मन म्हणजे प्रेम ….

कोणाशिवाय मरणं म्हणजे प्रेम की …
कोणासाठी जगणं म्हणजे प्रेम …

कोणासोबत चालणं म्हणजे प्रेम की ….
आयुष्यभर कोणासाठी थांबणं म्हणजे प्रेम की ….

कुणीतरी सुखात असल्याचा आनंद म्हणजे प्रेम की ….
कुणाच्या तरी सोबतीताला आनंद म्हणजेच प्रेम ….

…… पावसात ती …..

 

 

 

पाण्याने भिजलेली …

थंडी ने शहारलेली …

विजांच्या कडकडाटाने घाबरलेली …

पावसाच्या थेंबांनी नटलेली …

ओलाव्याने सजलेली …

छत्रीत लपलेली …

चिखलावर थोडीशी रागावलेली …

पण वार्याने सुखावलेली …

दगडा दगडावर पाय टाकत चाललेली …

स्वतः ची स्वतःच सावरलेली …

खोटी खोटी रुसलेली …

थोडीशी लाजलेली …

माझ्याशी हसलेली …

जोराच्या पावसात ….

काळ्या ढगांच्या काळोखात … 

छत्र्यांच्या गर्दीत ….

खरंच ती … 

ती फार …. सुंदर दिसत होती …….. आई …..

जेव्हा तुला वाटायचं 

मला समजत नाही …

तू ते मी काढलेलं पहिलं चित्र …

Showcase च्या त्या काचेत ठेवलंस …

ते पाहून मला अजून एक चित्र काढावसं वाटलं ….

जेव्हा तुला वाटायचं 

मला समजत नाही …

तू त्या मागच्या खिडकीतल्या मांजरीला ….

भरलेल्या वाटीतून दुध प्यायला द्यायचीस …

तेव्हा मला समजलं .. कि प्राण्यांवर दया करावी …

जेव्हा तुला वाटायचं 

मला समजत नाही …

तू फक्त माझ्या वाढदिवसासाठी …

ती खीर बनवायाचीस ….

आणि मला समजलं की ….

आयुष्यात या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा…

किती महत्वाच्या असतात ना ….

जेव्हा तुला वाटायचं 

मला समजत नाही …

तू त्या देव्ह्यार्यापाशी प्रार्थाना म्हणायचीस ….

तेव्हा मला वाटायचं …. की …

तिथे देव आहे … आणि तो तुझ्याशी बोलतो ….

जेव्हा तुला वाटायचं 

मला समजत नाही …

तू माझ्या केसांतून प्रेमाने हात फिरावायाचीस …

तेव्हा मला प्रेमाचा अर्थ समजला …

जेव्हा तुला वाटायचं 

मला समजत नाही …

मी तुझ्या डोळ्यांत अश्रू पाहिले …

तेव्हा मला समजलं की …

कधी कधी काही गोष्टीं मुळे दुख होतं …

तेव्हा रडलं तरी चालतं  …

जेव्हा तुला वाटायचं 

मला समजत नाही …

तू हसायचीस ….

तेव्हा मला वाटायचं …

मीही नेहमी हसत राहावं …

आणि तुझ्या सारखं छान दिसावं …

जेव्हा तुला वाटायचं 

मला समजत नाही …

मी आजारी असताना तू कितीतरी रात्री …

माझ्या काळजीत जागून घालवल्यास …

तेव्हा मला समजलं …

Doctor नुसती औषधे देतो … बरं नाही करत …

जेव्हा तुला वाटायचं 

मला समजत नाही …

तू माझी काळजी घेतलीस …

तेव्हा मला समजलं …

मी तुझ्या साठी …. काहीही केलं तरी …

तुझे उपकारांची मी परतफेड करू शकत नाही ….

जेव्हा तुला वाटायचं 

मला समजत नाही …

पण …. मी पाहिलं ….

आणि मला बरंच समजलं …

तुझ्या शिवाय मी नसतोच …..

आणि माझ्या आयुष्यात तूच देव आहेस ….

….. Thank you आई …… Thank you ….

…… सडकछाप “Poetरी” …..

I saw her yesterday… She was wearing a saari ….

She was looking लई भारी …

That was the moment I decided that …

she is that नारी …

I must marry…

She was standing on a bus stop ….

wearing a green top ….

she made my heart beat stop …

for next five days she was in my dreams … non-stop …

She was busy on a call …

looking like a झक्कास माल …

देख के मेरा दिल हुआ बेहाल …

लगने लगा उसका घर मेरा ससुराल …

She was walking on the road …

I like her smile …  so I told her …

के यार मुझसे रिश्ता जोड …

मेरे लिये ये जग छोड …

हा बोल … मेरा दिल मत तोड …

she looked at me and smile …

we had eye contact … just for a while …

that shoots my heart like a missile ….

I follow her for about a mile ….

She was a teacher in a school …

was looking very beautiful …

I gave her rose का फूल …

I said her “में तेरे प्यार मे सब गया भूल “….