मला पाऊस जाम आवडतो….

पावसाळ्यात लोकांना traffic चा त्रास असतो…
trains मध्ये गर्दी असते….
रसत्यात चिखल आणि गल्ली गल्लिमधल्या घरांत पानी साचलेल असतं…
मला पावसात हसताना पाहुन….
मला विचारतात तुला पाऊस का आवडतो….!
तेव्हा मी बराच केला ….

जेव्हा पावसात रसत्यात चिखल साचतो….
चिखलात तू स्वताला सावरते….
चिखलात सावरत सावरत…..
छत्री सांभाळत सांभाळत ….
जेव्हा तू चालते….
तेव्हा सावरलेली तू ….खुप छान दिसते….
म्हणून मला पाऊस जाम आवडतो…..

जेव्हा पावसात जोरात वारा येतो….
त्या वार्याने तुझी छत्री उलटी होऊन तू भिजते….
त्यावेळी पावसावर वैतागलेली….
आणि स्वतावर हसलेली तू खुप छान दिसते….
म्हणून मला पाऊस जाम आवडतो…..

जेव्हा पावसात रस्त्यांवर पाणी साचतं ….
त्यावेळी एखादी गाडी तुझ्या नकळत …
तुझ्यावर पाणी उडउन तुला भिजउन जाते….
तेव्हा त्या driver वर रागावालेली….
तू खुप छान दिसते….
म्हणून मला पाऊस जाम आवडतो…..

जेव्हा पावसात नाचावसं वाटतं….
तेव्हा तू खुप खुश होऊन पावसात नाचते…
लहान मुलांसारखि बागड़ते….
तेव्हा त्या पावसात मनापासून हसलेली तू खुप छान दिसते…
म्हणून मला पाऊस जाम आवडतो…..

जेव्हा अचानक पाऊस येतो …
सगळे जग त्याच्या ओलाव्याने भिजते….
अशाच पावसात ओलीचिंब भिजलेली…
ठंडी ने शहारलेली तू खुप छान दिसते….
म्हणून मला पाऊस जाम आवडतो…..

जेव्हा पाऊस विजांचा कड़कडाट करतो….
विजांच्या कडकडाटाने तु घाबरते….
आणि त्यांना घाबरुन तू माझ्या मिठीत येते…..
घाबरलेली तू माझ्या मिठीत… किती सुंदर दिसते…
म्हणून मला पाऊस जाम आवडतो…..