….प्रेम म्हणजे काय???…..कुणीतरी आवडणं म्हणजे प्रेम की …
कोणाच्या डोळ्यात हरउन जाणं म्हणजे प्रेम …

कोणालातरी सारखं पाहत रहावसं वाटणं म्हणजे प्रेम की …
कोणालातरी विसरता न येणं म्हणजे प्रेम ….

कोणाची तरी प्रत्येक गोष्ट आवडणे म्हणजे प्रेम की …
आपली आणि कोणाच्या तरी आवडी जुळणे म्हणजे प्रेम …

कोणी स्वप्नांत येणं म्हणजे प्रेम की …
कोणाच्या सहवासात … स्वप्न जगल्यासारखं वाटणं म्हणजे प्रेम …

कोणावर विश्वास ठेवणे म्हणजे प्रेम की ….
कोणाचातरी विश्वास कधीच न तोडणे म्हणजे प्रेम ….

कुणाला माफ करणे म्हणजे प्रेम की ….
कुणाची तरी उगीचच माफी मागणे म्हणजे प्रेम ….

कुणाकडून काही घेणं म्हणजे प्रेम की ….
न मागता कोणाला काहीतरी देणं म्हणजे प्रेम ….

कोणासाठीतरी रडणारं मन म्हणजे प्रेम की ….
कुणाच्या तरी आठवणींत हसणारं मन म्हणजे प्रेम ….

कोणाशिवाय मरणं म्हणजे प्रेम की …
कोणासाठी जगणं म्हणजे प्रेम …

कोणासोबत चालणं म्हणजे प्रेम की ….
आयुष्यभर कोणासाठी थांबणं म्हणजे प्रेम की ….

कुणीतरी सुखात असल्याचा आनंद म्हणजे प्रेम की ….
कुणाच्या तरी सोबतीताला आनंद म्हणजेच प्रेम ….