आज पुन्हा मला तुझी आठवण झाली,

आज पुन्हा मनात… त्या जुन्या क्षणांची साठवण झाली…


आज पुन्हा मी काहीतरी विसरलो,

आज पुन्हा मी तुझ्या विचारांत हरवलो…


आज पुन्हा तुला भेटावसं वाटलं,

आज पुन्हा तुझ्या बरोबर बोलावसं वाटलं…


आज पुन्हा चुकल्यासारखा मला जाणवलं,

आज पुन्हा माझं मन दुखावाल्यासारखं काहीसं घडलं…


आज पुन्हा in-box मधले तुझे mails वाचले,

आज पुन्हा तुझ्या calls ची वाट पाहिली…


आज पुन्हा मित्रां मध्ये मी एकटाच राहिलो,

आज पुन्हा मी एकट्यातच रडलो…


आज पुन्हा तू मला समजून न घेतल्याचा मला वाईट वाटलं,

आज पुन्हा कोणीच सोबती नसल्यासारखं मला वाटलं…


आज पुन्हा दिवसभारात काही नवीन नाही घडलं,

आज पुन्हा मी दिवसाला काल सारखंच संपवलं ….