भरपूर मोठ्या रस्त्या वरून चाललोय …
सोबती मात्र कोणी नाही ….

कुठेतरी शेवट असेल म्हणून चाललोय ….
पायांत ताकात मात्र अजिबात राहिली नाही ….

आयुष्य बाकी आहे म्हणून जगतोय ….
जगायची इच्छा मात्र राहिली नाही ….

मित्र आहेत …. बरेच आहेत …
मैत्री मात्र राहिली नाही ….

प्रेमात पडलोय म्हणून प्रेम आहे ….
प्रेमावर विश्वास मात्र राहिलेला नाही …

नाती आहेत म्हणून नातेवाईक आहेत …
नात्यांतले संबंध मात्र राहिले नाही ….

घड्यालाहे म्हणून time आहे ….
वेळ मात्र कोणाकडेच राहिला नाही …

मंदिर आहे म्हणून देव आहे ….
देवावर विश्वास मात्र राहिलेला नाही ….

दोन पायांवर चालतो म्हणून माणूस आहे …
माणुसकी मात्र राहिलेली नाही….