बे एके बे ,
बे दुने चार …
वेडा झालो मी …
जेव्हा पाहिलं तुला यार ….

बे त्रिक सहा ,
बे चोक आठ ,
रात्रं दिवस करत राहतो तुझाच विचार …
मला वाटतं आता लागली माझी वाट …

बे पंचे दहा ,
बे सक बारा ,
प्रेमाबिमाचा लफडा …
वाटतो मला हा सारा ….

बे साती चौदा ,
बे आठी सोळा ,
फसवणार नाही तुला कधीच…
आहे मी साधा भोळा …

बे नवे अठरा,
हो म्हण मला …
माझा करू नको बकरा …

नाही म्हणशील मला तर …
नंतर करत राहशील मला miss …
आहे बे दाहे वीस ….