एकटा आलो मी,
एकटाच चाललो,
एकटा होतो मी,
एकटाच राहिलो…

सगळ्यांसोबत एकटा,
सगळ्यांशिवायही एकटाच,
गर्दीत एकटा मी,
मोकळ्या वाटेतही एकटाच…

एकटा बोलतो मी,
मी … एकटाच ऐकतो,
कधी हसलो एकटा,
अन बर्याचदा एकटाच रडलो …

होतो प्रवासात एकटा मी,
Destination ला पोहचलो …
होतो तिथेही एकटाच,
दिवसाच्या उजेडात एकटा मी,
रात्रीच्या काळोखातही एकटाच …

विचारांत एकटा,
प्रयत्नांत एकटाच,
हरल्यामुळे मी राहिलो एकटाच,
जिंकलो असतो तर काही काळ … नसतो मी एकटा….

मित्रांत एकटा मी,
नात्यांत एकटा …
दोघांतही एकटा मी…
सोबतीही माझा … मी एकटाच …

एकटाच घरात मी,
दारातही एकटाच ….
काळजी माझी मला एकट्यालाच,
वाट पाहतो मी एकटाच …

एकटाच जगलो मी,
एकटाच वाचलो,
…. एकटाच संपलो मी ….
शेवटपर्यंत एकटाच राहिलो ….

Advertisements