Blog वर मी आत्तापर्यंत नेहमी कविताच लिहित आलो …एवढ्या कविता लिहून मला तर कवी असल्यासारखंच वाटायला लागलंय … 🙂 … आजकाल मी तर बोलता बोलता पण कविता करायला बघतो … प्रत्येक वाक्याच्या शेवटी rhyming words जोडून लावतो … 😀 म्हणूनच मला आज एक गोष्ट लिहावाशी वाटते … “गोष्ट एका राजकन्येची “….  गोष्ट लिहायचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे …. तेव्हा आधीच सांगून ठेवतो … चूकभूल माफी … आणि काही चांगलं वाईट असेल तर कृपया comment करा …. 🙂

 

….गोष्ट एका राजकन्येची ….

एका छोट्याशा गावात एक राजा राज्य करीत होता. त्याला राणी, राजपुत्र आणि दोन राजकन्या होत्या. पण सगळ्यात छोटी जी राजकन्या होती ती त्यांच्या घरात सगळ्यात लाडकी होती. ती अगदी साधी राहाणारी, थोडीशी खोडकर पण भरपूर हुशार आणि मेहनती होती. ती त्या राज्यात देखील सगळ्यांची लाडकी होती. तिच्या भरपूर मैत्रिणी देखील होत्या तिथे.

एकदा राजाला वाटलं कि आपल्या या छोट्याश्या राजकन्येने भरपूर मोठी योद्धा व्हावं. आपल्या राज्कुमारासोबातच तिने देखील आपल्या राज्याचा विस्तार करावा…. वगैरे, वगैरे… जे सगळ्याच आई वडिलांना आपल्या मुलांबद्दल वाटतं ते त्यांना देखील वाटत होतं. त्यासाठी त्यांनी त्या राजकन्येला लढाई चं शिक्षण घ्याला राज्याबाहेर … दुसर्या राज्यात पाठवायचं ठरवलं. राजकन्येने हि त्यासाठी होकार दिला.

वेगळे राज्य, नवीन मित्रा मैत्रिणी … पण आई बाबांपासून दूर … त्यामुळे ती थोडी अस्वस्थ होती पण पण तिच्यात लढाई शिकण्याची, बाबांचा स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द होती, म्हणून आपल्या आवडी-निवडी, आपला comfort या सर्वांशी compromise करून ती तिथे होती.

अचानक एके दिवशी तिथे तिचा अपघात झाला. बर्याच जखमा झाल्या तिला, बराच रक्त पण वाहून गेला होतं तिचं. त्यासाठी तिला बराच काल आराम घ्यावा लागणार होता. म्हणून तिला पुन्हा तिच्या राज्यात पाठवलं. आता आपल्या बाबांचा स्वप्नं कसं पूर्ण करायचं? मी ते पूर्ण करू शकेन कि नाही याच विचारांत ती असायची. आपण त्यांच स्वप्न पूर्ण नाही करू शकणार या विचाराने तिने एकदा आत्महत्येचा देखील प्रयत्न केला होतं. पण नंतर तिने स्वताला सावरलं. प्पुर्वी पेक्षा जास्त मेहनत घेण्याचा निर्णय तिने घेतला.

काही दिवसांच्या विश्रांती नंतर ती पुन्हा शिक्षणासाठी त्या दुसर्या राज्यात गेली. तिथले तिचे सर्व जुने मित्र मैत्रिणी तिच्या पेक्षा भरपूर पुढे गेले होते. ते सर्व लढाईत तरबेज झाले होते. ते सर्व तिचे friends तिला विसरून गेले होते. ते तिचे friends राहिले नवथे. तेव्हाच त्या राजकन्ये ने ठरवलं कि मित्र मैत्रिणी काही नसतात, कोणीच नसतात ते आपले…. आपण एकटेच असतो. आपली लढाई ची हत्यारेच आपले खरे मित्र असतात. तेव्हा पासून तिने स्वताला त्या शिक्षणात हरउन बसली. पण असा बोलतात ना कि मन मोकळं करायला कोणीतरी लागतंच .. म्हणूनच तिची तिथे एका दुसर्या राजकन्ये बरोबर मैत्री झाली. ती तिची अगदी खास मैत्रीण बनली. अगदी जवळचीच. काही दिवसांत त्या राज्यातल्या एका साधारण व्यापार्या बरोबर तिची ओळख झाली … काही दिवसांत चांगली मैत्री देखील झाली.

राजकन्या लढाईत भरपूर हुशार झाली. अगदी निष्णात योद्धा झाली. लढाई चं शिक्षण संपून ती परत तिच्या राज्यात गेली. तिथे राजा ला तिच्या भावाला मदत करू लागली. त्यांनी भरपूर राज्या जिंकली. आणि अचानक एकदा तिची मैत्रीण तिच्या समोर येऊन थबकली. तिने तिच्या नवीन जिंकलेल्या राज्यावर हल्ला केला. राजकन्या तिच्या समोर नाही जिंकू शकली. तिची तिच्या सोबत लढाईची इचा सुद्धा नवती आणि स्वताचा सैन्य देखील तिने परत मागे बोलावून घेतले. तिने हार मान्य केली. तिने राजाला सांगून ते सर्व राज्य तिला देण्यास भाग पाडलं. आणि त्यांची मैत्री देखील तिथेच संपली.

राजकन्या या धक्याने अगदी कोलमडून पडली. मनापासून अगदी तुटून गेली होती. तिला अगदी एकट पडल्यासारखा वाटू लागलं होतं. त्यामुळे तिने या सगळ्या लढाई वगैरे मधून थोडासा वेगळा होऊन काही काळ आराम करण्याचा निर्णय घेतला. अश्या परिस्थितीत तिला पुन्हा तिचा तो जुना व्यापारी मित्र भेटला. तोच एक आपला आधार असल्यासारखा राजकन्येला वाटू लागलं. ती नकळतच त्याच्या प्रेमात पडली. तिने त्या व्यापार्याला तसं सांगितलं. तो व्य्पारीदेखील तिला नाही म्हणू शकत  नवथा. कारण तिच्या अश्या परिस्थितीत तो तिला एकट सोडू शकत नवथा. म्हणून त्याने तिचं प्रेम मान्य केलं. दोघे कधी कधी भेटू लागले, आणि तो व्यापारीदेखील तिच्या प्रेमात पडत गेला. पण एक व्यापारी आणि एक राजकन्या दोघे एकत्र येणं जवळ जवळ अशक्यच आहे हे दोघेही ओळखून होते. मग राजकन्येने ठरवलं कि ती तिच्या बाबांचा स्वप्न पूर्ण करणार, त्यांच गेलेला राज्या परत मिळवणार… आणि मग त्यांची परवानगी मिळून घेणार. तेव्हा कोणीही त्यांना एकत्र येण्यापासून नाही अडवू शकत. आणि त्यासाठी त्यांनी तोपर्यंत वेगळं होण्याचा निर्णय घेतला, पण दोघांमध्ये पत्र व्यवाहार चालू ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला.आणि दोघे वेगळे झाले.

बराच काळ लोटला. राजकन्येने तिच्या भावासोबत आणि वडिलांसोबत बरीच राज्य जिंकली. व्यापारीही दरम्यान बराच फामोउस झाला होता. बराच श्रीमंत झाला होता. तो नेहमीच राजकन्येला पत्र पाठवायचा. पण कधी राजकन्येचा उत्तर नाही आलं त्याला. राजकन्या बरीच व्यस्त असेल. तिने कधी पत्र वाचल्यावर, तिला वेळ मिळाल्यावर नक्कीच पत्र पाठवेल याच विश्वासाने तो पत्र पाठवतच राहिला.

एके दिवशी तो व्यापारी एका नवीन राज्यात व्यापार सुरु करण्यास गेला. तिथल्या राजाने त्याला आमंत्रण दिले होते. तो राजाच्या दरबारात गेला. यापाराच्या संदर्भात बोलणे झाल्यावर राजाने व्यापार्याला आपल्या राजमहालात भोजनासाठी आमंत्रण दिले. ते आमंत्रण स्वीकारून व्यापारी राजाच्या राजमहालात भोजनाला गेला. तिथे राजाने व्यापार्याची ओळख त्याची राणीबरोबर करून दिली. ती राणी म्हणजे तीच होती …. तीच ती व्यापार्याबरोबर प्रेम करणारी ती राजकन्या. व्यापारी समजून गेला होता. राजकन्येचा सोडन जाणं, त्याच्या पात्रांना उत्तर न देणं. त्याच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले. भोजनानंतर तो त्या राज्यातून निघून गेला.

त्याला भरपूर वाईट वाटत होतं. राजकन्येच त्याला प्रेमात पाडणं आणि नंतर त्याला सोडून जाणं त्याला सहन नाही झालं. तो त्याच विचारांत होता. समुद्रामार्गे एका जहाजातून प्रवास करत होता. त्याच वेळी वादळ आलं. व्यापार्याच जहाज त्या वादळात अडकलं आणि समुद्रात बुडून गेलं. व्यापारी त्यात नाही वाचू शकला… तो संपला…

आणि या सोबतच बाकी सगळ्या story’s सारखी या story ची देखील Happy Ending झाली. आता तुम्ही म्हणाल कि happy ending कशी..?? हि गोष्ट कोणाची आहे??? त्या राजाकान्येचीच ना!! मग तो व्यापारी नाही राहिला म्हणजे तिच्या life मधला तो chapter संपलाच ना…. म्हणजे आता तिला उगीचची त्या व्यापार्याची येणारी पत्र नाही …. फुकटच त्याचं tension नाही ना… मग तिच्या साठी “Happy Ending”च ना… 😀

 

Advertisements