…. शेवटी भेटलं …..


College मध्ये गेलो,

रात्रं-दिवस जागलो,

अभ्यास केला,

डिग्री मिळवली,

शेवटी हाती आली ….. बेकारी ……


ती आवडली,

तिलासुद्धा मी आवडलो,

प्रेम केलं,

फोन वर बोललो,

भरपूर फिरलो ,

ती सोडून गेली,

शेवटी राहिली ….. उदासी ….


job मिळवला,

लग्न केलं,

बाप झालो,

आजोबा झालो,

शेवटी भेटलं ……. म्हातारपण …..


रस्त्यात चालताना बरेच लोक भेटले,

त्यांना सगळ्यांसारखे आम्हीही “मित्र” म्हटले,

रस्ते बदलले,

मित्र बदलले,

मी रस्त्यात थांबलो,

मित्र विसरले,

शेवटी भेटला ….. एकटेपणा ….


हे केलं,

ते केलं,

सगळं केलं,

ह्यांचं …. त्यांचं … सगळ्यांचं ऐकलं,

करता करता …. आयुष्य गेलं,

मरण आलं…..

शेवटी भेटलं…….. !!!!!