…. हीच Engineering आहे तर ….

“यही ज़िन्दगी हैं तो क्या ज़िन्दगी हैं ….” ह्या traffic signal मधल्या गान्यावरून काहीसं inspired होउन मी ही कविता लिहली आहे …

…. हीच Engineering आहे तर ….


…. हीच Engineering आहे तर ….
ही काय इंजीनियरिंग आहे …?
कुठे admissions च्या रांगेत सुरु होते …
कुठे घरांत पुस्तकांची रद्दी वाढवते …
कुठे रॉकेल xerox च्या वासात गुदमरते …

…. हीच Engineering आहे तर ….
ही काय इंजीनियरिंग आहे …?

कुठे mechanics बनून Friction करते …
कुठे maths बनून integrate करते …
कुठे probability बनून सांभाळुन घेते …
कुठे chemistry च्या reactions करते …

…. हीच Engineering आहे तर ….
ही काय इंजीनियरिंग आहे …?

कुठे physics चे laws विसरते …
कुठे transistor च्या emitter- collector मध्ये confuse होते …
कुठे frequency bands मध्ये अड़कुन पड़ते…
कुठे physical memory नेहमीच full असते …

…. हीच Engineering आहे तर ….
ही काय इंजीनियरिंग आहे …?

कधी assignments बनून बरसत असते …
कधी free lecture साठी तडपत असते …
कधी submissions च्या वेळी वाट लावते …
कधी लिहून लिहून बोटांना फोड़ आणते …

…. हीच Engineering आहे तर ….
ही काय इंजीनियरिंग आहे …?

कधी चालु lecture मध्ये झोपते …
कधी रात्री रात्री जागवून घालवते …
कधी वेळे पेक्षा जोरात धावते …
कधी अशीच थांबून धावत्या वेळेकडे पाहत राहते …

…. हीच Engineering आहे तर ….
ही काय इंजीनियरिंग आहे …?

कधी KT बनून दुखावत राहते …
कधी Golden attempt बनून सतावते …
कधी circuit मधल्या current सारखी भटकत राहते …
कधी drop बनून भरपूर रडवते …

…. हीच Engineering आहे तर ….
ही काय इंजीनियरिंग आहे …?

कधी vivas च्या वेळी निःशब्द करते …
कधी practicals च्या वेळी साध्या साध्या readings चुकवते …
कधी theory exams साठी रात्रं दिवस जागवते …
तरी papers मध्ये कुठेतरी काहीतरी कमी राहते …

…. हीच Engineering आहे तर ….
ही काय इंजीनियरिंग आहे …?

कधी results च्या वेळी भीती ने घाबरवते …
कधी तुटलेल्या स्वप्नांत टोचत राहते …
कधी job साठी डोळ्यांत पाणी आणते …
नेहमीच future च्या प्रश्नांत present ला मागे सारते …

…. हीच Engineering आहे तर ….

ही काय इंजीनियरिंग आहे …?…..

Advertisements