….. या जगात सगळ्यांनाच …..

या जगात सगळ्यांनाच हवं ते भेटत नसतं ….

आणि तरीही न भेटनार्या गोष्टींमागे मन का धावत असतं ?…
कधी जमिनीवर तर…
कधी उंच ढगांतच compromise करावं लागतं ….
इथे सर्वच जण स्वताच्या धुंदीत असतात ….
शब्द बरेचसे अड़कुन पडलेत …

मनाच्या कोपर्यात ….
पण त्याना मोकळं करायाला …
मित्र कुठेच नसतात ….
आकांशा सगळ्यांच्याच …

भरपूर मोठ्या असतात …
त्यांना पूर्ण करायला इथे सगळेच
दुसर्यांचा वापर करतात …
पण आपल्या मदतीसाठी इथे क्वचितच …
लोक आपल्याला भेटतात …
स्वप्न पहायला रात्रीची झोप कमी पड़ते …

त्यांना पूर्ण करायला दिवस भरची मेहनत कमी पड़ते …
होतात स्वप्न पूर्ण तेव्हा ….
… जेव्हा ज्यांच्या बरोबर पाहिली
त्यांची कमी जाणवते ….
सगळ्यांनाच होतं प्रेम जगात …

त्याची इथे काही कमी नाही …
पण ज्यांच्या कडून असते अपेक्षा प्रेमाची …
त्यांच्या कडून ते प्रत्येकाला भेटतच असं नाही …
स्वप्नात आकाशातले तारे हातात दिसतात …

पण reality मध्ये … दिवसाच्या उजेडात …
डोळ्यांसमोर अंधार दाटतो …
आणि रात्रीचा चंद्र सुद्धा आगीच्या गोळ्यासारखा भासतो …
होय … सगळ्यांच्या म्हनण्याप्रमाने …

वेळ नक्कीच सगळं normal करेल …
पण गेलेल्या वेळेला Rewind मध्ये जावून …
कोणी कसं change करेल???
Advertisements