….. प्रिये तुझ्या साठी ….


प्रिये तुझ्या आठवनित  काल चालत होतो …
तेव्हा एका Bike ने मला ठोकले …
हाताला जखम झाली आणि भरपूर रक्त वाहू लागले …
रक्त वाया जाऊ नए म्हणून,
मी त्यानेच Love letter रखडले …
या सगळ्या लफड्या नंतर…
मी डॉक्टर कड़े गेलो …
त्याने पाच टाके लावले आणि,
बिलाचे पाचशे रूपये घेतले …


प्रिये तू माझ्यात interested आहेस या नादात …
मी नेहमीच तुला call करत राहिलो…
तुझा Reply नाही आला …
तरीही मी SMS करत आहिलो …
महिन्याभाराचा balance माझा,
आठवडयातच संपायला लागला …

प्रिये तुझ्या साठी…
मी गुलाबाचं झाड लावणार आहे,
तुझा मला होकार असेल तर …
तुझ्या केसांत गुलाब लावणार …
नाहीतर फूलवाला बनून …
माझे balance चे पैसे वसूल करणार आहे …

प्रिये तुला भेटायला मी तुझ्या घरी येणार आहे …
तुझ्या घरातल्यांना मी आवडलो तर …
तुला मी perfume gift देणार …
आणि नाही आवडलो तर salesman बनून …
फेनोइल आणि Detergent विकून माझे…
Perfume चे पैसे वसूल करणार आहे …

प्रिये तुझ्या आठवनित मी …
एक chicken shop उघडणार आहे …
तुझ्यावरचा राग …
मी तिथल्या कोम्बड्यां वर काढणार आहे …
पण तिथल्या अंड्यांना मी …
माझ्या मनातल्या प्रेमासारखी जपनार आहे …

बघ तुला आठवतात काय ते Pizza Hut’s चे pizzas …
आणि CCD ‘s च्या coffees ….
Natural’s च्या त्या ice -creams …
आणि मी तुला सांगितलेल्या त्या माझ्या Day dreams …

प्रिये आपली झालेली प्रत्येक भेट …
मला सुखद आठवण देऊन गेली …
पण प्रत्येक वेळी माझ्या पाकिटातली …
at least १०० रुपयांची नोट घेउन गेली ….
Advertisements