आपल्या life मध्ये बरेच लोक येतात आणि जातातही, पण त्यातले काही लोक गेल्यावरही त्यांच्या मागे मनातली त्यांची जागा …. तो कोपरा … मोकळा ठेऊन जातात …जिथे त्यांच्या शिवाय कोणी दुसरा राहू शकत नाही … तिथे शेवटपर्यंत राहतात त्या त्यांच्या आठवणी …. आणि एक वेडी आशा … इच्छा … त्यांची परत येण्याची …..

अशाच एका मित्राने त्याच्या गेलेल्या मित्रा साठी लिहिलेली एक छोटीशी कविता ….

….. अजूनही ….

मला अजूनही असं वाटतं …
तू जूनं  सगळ विसरून तू पुन्हा माझ्याशी बोलणार …
आपली पुन्हा पहिल्या सारखी,
घट्ट मैत्री होणार …

मी तुला चिडवनार,
तू नेहमी सारखच खोटं खोटं रागावनार …
मग थोडसं हसून तू,
तुझा राग शांत झाल्याचं दाखवणार ….

मी कधी Tension मध्ये असताना …
तुझा एखादा sms येणार ….
नकळतच माझ्या चेहर्या वर Smile देऊन …
माझं Tension विसरवनार ….

आपण कधीतरी Movie चा plan करणार …
पाहिजे ती Movie “House Full” म्हणून…
मी दूसरी चे Tickets काढणार …
The End नंतर ती पकाऊ होती म्हणून तू मला ओरडत राहणार …

कधी मला रडताना पाहून…
तुझं मन गहिवरून येइल,
माझ्या पाठीवरून हात फिरवत …
तू माझे डोळ्यातले अश्रु टिपशील …

रस्त्याने चालता चालता …
मी तुझ्या Call ची वाट पाहत असतो…
खरं सांगतो मित्रा .. तुझ्या आवाजातला …
तू मला म्हटलेला Hello मला ऐकवासा वाटतो …

कसं ना!! पटकन तू …
मला तुझ्या लाइफ मधून काढून टाकलस,
पण तुला माझ्या लाइफ मधून काढून टाकायला …
मला अजुन का नाही जमलं …

तू परत येणार नाही …
हे मला देखिल माहिती आहे …
पण माझं मन माझं ऐकतच नाही…
तुझी वाट पाहणं थांबवतच नाही …

मला वाटतं …. मी दिसल्यावर….
तू मागे वळून पाहशील …
वळून पाहण्या एवढी  तरी जाणीव …
तू आपल्या मैत्रि ची ठेवशील ….