लहानपणी भोलानाथाला (नंदिबैलाला ) आपण विचारायचो …. पाऊस पडेल काय …? आत्ता आपल्याला तो भोलानाथ भेटल्यावर आपण त्याला काय विचारू…? म्हणजे नक्कीच काहीतरी वेगळं आपण विचारू …. असेच आपल्यातल्या एखाद्याने विचारलेले काही प्रश्न ….


.…. सांग सांग भोलानाथ … !!! ….

सांग सांग भोलानाथ, ती हो म्हणेल काय ?
माझा हाथ हातात घेउन, मग ती मला मिठीत घेइल काय ?

भोलानाथ दुपारी ती Movie ला येइल काय ?
Advance booking केली नाही, मग Current मधे Corner Seats भेटतील काय ?

भोलानाथ भोलानाथ खरं सांग एकदा …
संपेल ना रे Recession Period आता ?

भोलानाथ उद्या आहे, KT चा पेपर …
सोपा जाइल ना रे , मला आता करायचाय तो Clear ?

भोलानाथ भोलानाथ, जॉब मिळेल काय ?
आकाशातून पैशांचा पाऊस पडेल काय ?

भोलानाथ Alladin चा चिराग भेटेल काय ?
भोलानाथ Harry Potter सारखी जादू येइल काय ?Advertisements