पाऊस म्हणजे …. प्रत्येकासाठी वेगळा अनुभव …. म्हणुन पाऊस म्हणजे प्रत्येकासाठी वेगळी Definition, काहींना त्याचा राग येतो … तो नको नकोसा वाटतो… तर काहींना तो एवढा आवडतो, वाटतं तो रोज रोज पडावा… तशाच काही दोन वेग-वेगळ्या विचारांचा पाऊस …

…… पाऊस म्हणजे ……

पाऊस म्हणजे काळोख दाटणं, ढगांचा रडणं,
विज कोसळणं, नद्या समुद्राच रागवणं …

पाऊस म्हणजे हिरवळ पसरणं, श्रुष्टीचं हसणं,
निसर्गाचं बाहरणं, इंद्रधनुष्य दिसणं …

पाऊस म्हणजे सगळी कड़े पाणीच पानी साचणं , झाडांचं पड़णं ,
Traffic jam, रस्त्यावर चिखल …

पाऊस म्हणजे चिखलात Football खेळणं, समुद्र किनारी फिरणं,
Water-Fall खाली मस्ती, कड़क चहा आणि गरमागरम भजी …

पाऊस म्हणजे रस्त्यावर खड्डे, त्यात पाण्याचे साचने,
त्यातून गाड़ी गेली की, ते पानी कपड्यांवर उडून कपडे ख़राब होने …

पाऊस म्हणजे रस्ता रंगीबेरंगी चत्र्यांनी झाकणं, कोणाला तरी भेटायला मनाचा हट्ट करणं,
पाऊस म्हणजे श्रावण, …. श्रावण म्हणजे Romance ….
म्हणुन कदाचित … पाऊस म्हणजे Romance ….

Advertisements