…….. पैसा …..

पैसा जवळच्या अनेकांना दूर नेतो ,
पण भरपूर दूरच्या अनोळखी लोकांना आपल्या जवळ देखिल आणतो …

पैसापुस्तक देतो ज्ञान नाही ,
पण नुसतं ज्ञान घेउन काय मिळतं ?

पैशांत स्वप्न विकत घेता येत नाहित ,
पण पैशांशिवाय स्वप्न पूर्ण होत नाहित …

पैसा प्रेम विकत नाही घेऊ शकत नाही …. असं म्हणतात ,
पण पैशांशिवाय तुमच्या प्रेमाला कोणी किंम्मतही देत नाही …

पैसा भले खरे मित्र देत नाही ,
पण निदान त्यावेळी शत्रु तरी Standard चे असतात …

पैशांच्या लोभाने मन भरत नाही ,
पण पैशां शिवाय पोट सुद्धा भरत नाही …

पैसा जरी या जगातल्या सगळ्या गोष्टी विकत घेऊ शकत नसला तरी ,
पैशां शिवाय काहीही भेटत नाही ….

Advertisements