….. तू …..

प्रेम माझे तू आहेस ,
प्रेयसी ही तूच आहेस ,
साथ माझी तू आहेस ,
वेड माझे तूच आहेस …

तूच माझे बोल ,
माझी कविता तूच आहेस ,
तूच माझे शब्द ,
वाक्य माझे तूच आहेस …

रात्र माझी तू आहेस ,
दिवस माझा तू आहेस ,
तूच इन्द्रधनुष्य माझा ,
पावसातही तूच आहेस …

देव माझा तू आहेस ,
धर्म देखिल तूच आहेस ,
भाव माझे तू आहेस ,
भवनांतही तूच आहेस …

तूच माझी बाग़ , त्यात
फुल देखिल तूच आहेस ,
रंग त्या फुलांचा नी ,
गंध त्यांचा तूच आहेस …

Mobile मी असेन तरी ,
Network माझा तूच आहेस ,
Bulb मी असेन तरी ,
Current माझा तू आहेस …

तूच माझा Past Tense ,
Present देखिल तूच आहेस ,
Future मधे नसशील तर ,
The – End माझा तूच आहेस …

स्वप्न माझे तू आहेस ,
स्वर्ग माझा तूच आहेस ,
जीवनात या माझ्या ,
सर्व काही तूच आहेस …